दसरा सुट्टीचा अभ्यास

कर्नाटक सरकारने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला होता. शाळा आधीसारखी भरल्याशिवाय अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया यशस्वी होणे केवळ अशक्य आहे. पण त्याला पर्याय म्हणून ” विद्यागम” ही योजना मागील दोन महिने राबविली गेली .ही योजना चालू असतानाच पुढील 15-20 दिवस दसरा सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे “विद्यागम” योजनेमुळे आलेला शिक्षक विद्यार्थ्यांचा थोडा फार संपर्कही आता बंद होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे अभ्यासाशी असलेले नाते तुटू नये म्हणून आम्ही दोन भागांमध्ये दसरा सुट्टीचा अभ्यास घेवून येत आहोत. भाग 1 वर्गवार सामान्य अध्ययन निष्पतीवर आधारीत आहे तर भाग 2 विषयावर आधारीत असेल.

दसरा सुट्टीचा अभ्यास भाग 1

इयत्ता पहिली

इयत्ता पहिली सुट्टीचा अभ्यास हा अक्षर ओळख, अंकांची ओळख, बिन हातच्याची बेरीज, चित्र रंगविणे, वस्तू ओळखणे , प्राणी पक्षी ओळख यावर आधारीत आहे..

DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता दुसरी

इयत्ता दुसरी सुट्टीचा अभ्यास हा इंग्लिश अक्षर ओळख, लहान मोठी संख्या , आकारांचे ज्ञान, सोपी इंग्लिश शब्द ,हातच्याची बेरीज, चित्र रंगविणे, वस्तू ओळखणे , प्राणी पक्षी ओळख यावर आधारीत आहे..

DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता तिसरी

इयत्ता तिसरी सुट्टीचा अभ्यास सोपी वाक्ये बनविणे , गोष्ट तयार करणे. नाणी ओळख, मोजमाप करणे इंग्लिश शब्द ओळख , चित्र रंगविणे, वस्तू ओळखणे , प्राणी पक्षी ओळख यावर आधारीत आहे..

DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी

इयत्ता चौथी सुट्टीचा अभ्यास इंग्लिश वाक्ये वाचणे व बनविणे , गोष्ट तयार करणे. नाणी व नोटांचा वापर, निबंध लिहिणे , गुणाकार , मोजमाप करणे , समानार्थी व विरुद्धार्थी शब्द , शब्द ओळख , चित्र रंगविणे, वस्तू ओळखणे , पाळीव व जंगली प्राणी ओळख यावर आधारीत आहे..

DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी

इयत्ता पाचवी सुट्टीचा अभ्यास इंग्लिश मध्ये स्वतःची ओळख , इंग्लिश वाक्ये वाचणे व बनविणे , गोष्ट तयार करणे. नाणी व नोटांचा वापर, निबंध लिहिणे , गुणाकार , भागाकार, मोजमाप करणे , समानार्थी व विरुद्धार्थी शब्द , शब्द ओळख , चित्र रंगविणे, वस्तू ओळखणे , पाळीव व जंगली प्राणी ओळख यावर आधारीत आहे.

DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी

इयत्ता सहावी सुट्टीचा अभ्यास निबंध लिहिणे, चित्राचे वर्णन , प्रश्न तयार करणे, इंग्लिश मध्ये स्वतःची ओळख , इंग्लिश वाक्ये वाचणे व बनविणे , गोष्ट तयार करणे. नाणी व नोटांचा वापर, गुणाकार , भागाकार, मोजमाप करणे , समानार्थी व विरुद्धार्थी शब्द , चित्र रंगविणे, वस्तू ओळखणे , यावर आधारीत आहे.

DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता सातवी

इयत्ता सातवी सुट्टीचा अभ्यास पुर्नांकांचा गुणाकार , भागाकार , चित्राचे वर्णन , प्रश्न तयार करणे, वर्ग, घन, मुळसंख्या, इंग्लिशमध्ये स्वतःची ओळख , इंग्लिश वाक्ये वाचणे व बनविणे , गोष्ट तयार करणे. नाणी व नोटांचा वापर, गुणाकार , भागाकार, मोजमाप करणे , समानार्थी व विरुद्धार्थी शब्द , चित्र रंगविणे, वस्तू ओळखणे , यावर आधारीत आहे.

DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...