इयत्ता पाचवी मराठी प्रश्नोत्तरे


1. नव्या युगाचे गाणे

अ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

  1. नव्या युगाचे गाणे कसे गाण्यास सांगितले आहे?

उत्तर –   नव्या युगाचे गाणे एक दिलाने गाण्यास सांगितले आहे

2. विज्ञानाच्या नभोमंडळी आपणास काय होण्यास सांगितले आहे?

उत्तर – विज्ञानाच्या नभोमंडळी आपणास तारे होण्यास सांगितले आहे.

3. कशाचा तेजोमय सूर्य उगवला आहे?

उत्तर – अज्ञानाचा तेजोमय सूर्य उगवला आहे.

  • अनेकतेतून आपणास कोणते गाणे गाण्यास सांगितले आहे?

उत्तर – अनेकतेतून आपणास एकत्वाचे गाणे गाण्यास सांगितले आहे.

  • ध्येय गाठण्यासाठी आपणास काय करण्यास सांगितले आहे?

उत्तर – ध्येय गाठण्यासाठी आपणास पुढे पुढे जाण्यास सांगितले आहे.

  • भारतभूमीची माती कशी आहे?

उत्तर – भारतभूमीची माती पवित्र आहे.

  • प्राण कशासाठी पणाला लावायचे आहेत?

उत्तर – धरणीचे रक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावायचे आहेत.

आ.    पुढे दिलेल्या कवितेच्या ओळींचा तुझ्या शब्दात अर्थ स्पष्ट कर.

  1. “मानवतेचा दीप अंतरी नित्य तेवत ठेवू”

         उत्तर – आपण सर्वांनी एकमेकासोबत राहून, जुने सर्व वाद मिटवून नव्या जोमाने आपली

प्रगती करत असतानाच माणुसकी जपत सर्वांना मदतीचा हात नेहमीच पुढे धरायला हवे.

असे कवयित्री आपल्याला वरील ओळीतून सांगत आहेत.

  • “विज्ञानाच्या नभोमंडळी आपण तारे होऊ.”

         उत्तर – आजच्या युगामध्ये विज्ञानाच्या रूपाने तेजोमय सूर्य उगवला आहे. अनेक नवनवीन शोध लावले जात आहेत. त्याच्याच सहाय्याने आपण अज्ञान रुपी अंधकार बाजूला सारून आपण आपली झेप ताऱ्यापर्यंत घेऊ असे वरील ओळींमध्ये म्हटलेले आहे.

      3. “रंग आपला वेगवेगळा सूर आपला एकसारखा”

        उत्तर – आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. येथे अनेक धर्माचे, जातीचे, भाषेचे, राज्याचे लोक एकत्र राहतात. जरी आपल्यात विविधता असली तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगती करू असे कवयित्री आपल्याला वरील ओळीतून सांगत आहेत.

  ई. गाळलेल्या जागा भर.

  1. हातामध्ये हात गुंफुनी देशहिताचे मंत्र जपोनी
  2. नव्या युगाचे गाणे या कवितेच्या कवयित्री श्रीमती शुभदा दादरकर.

उ. नमुन्याप्रमाणे लिहा.

1. नाभोमंडळी आपण तारे होऊ.

    2. एकत्वाचे गाणे आपण गाऊ.

    3. धेयमंदिरी पुढे पुढे रे जाऊ.

    4.प्राण पणाला लावू.

2. तीन मूर्ती

आ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

 1. कलेच्या रूपाने समाजाची सेवा कोण करतो?

उत्तर – कलेच्या रूपाने समाजाची सेवा कलाकार करतो.

 2. राजा मुर्तीकाराकडे काय घेऊन गेला होता?

उत्तर – राजा मुर्तीकाराकडे शंका घेऊन गेला होता.

 3. मूर्तिकार कशा प्रकारच्या मूर्ती तयार करत होता?

उत्तर – मूर्तिकार दगडातील नको असलेला भाग छिन्नीच्या सहाय्याने काढून टाकून मूर्ती

   तयार करत होता.

 4. पहिल्या मूर्तीची किंमत किती मोहरा होती?

       उत्तर – पहिल्या मूर्तीची किंमत शंभर मोहरा होती.

  5.. तीन मूर्तींना दगड वापरला होता?

         उत्तर –तीन मूर्तींना टणक व कणखर दगड वापरला होता.

  6.दुसऱ्या मूर्तीचे वैशिष्ट्य कोणते होते?

  उत्तर – दुसऱ्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मूर्तीच्या एका कानातून घातलेला दोरा तिच्या तोंडातून बाहेर पडतो.

7. सर्वश्रेष्ठ मूर्ती कोणती?

   उत्तर – तिसरी मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे.

  8. मूर्तीतील फरक कोणाच्या स्वभावाला लागू पडतात?

          उत्तर – मूर्तीतील फरक मानवाच्या स्वभावाला लागू पडतात.

  इ. खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिहा.

      1. मूर्ती बनवणे काम कठीण का असते?

            उत्तर – कणखर आणि टणक दगडापासून मूर्ती बनवणे एवढे सोपे नाही कारण एक जरी छिन्नीचा घाव जादाचा पडला की दगड फुटू शकतो.

      2. मूर्तिकार मूर्ती तयार करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवतो?

       उत्तर – मूर्तिकार त्या दगडातील नको असलेला  भाग तेवढाच छिन्नीच्या सहाय्याने   काढून टाकतो आणि मूर्ती आपोआप तयार होते.

3. मूर्तीकाराने तयार केलेल्या मूर्तींची किंमत किती होती?

    उत्तर – मूर्तीकाराने तयार केलेल्या पहिल्या मूर्तीची किंमत शंभर मोहरा, दुसऱ्या  मूर्तीची किंमत एकसहस्त्र मोहरा आणि तिसऱ्या मूर्तीची किंमत दशसहस्त्र मोहरा होती.

4.पहिल्या मूर्तीमध्ये कोणता मनुष्य गुण दडलेला होता?

             उत्तर – पहिल्या मूर्तीच्या एका कानातून घातलेला दोरा त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून   बाहेर पडतो म्हणजेच अशी व्यक्ती जी ऐकलेलं पटदिशी दुसर्याला बोलून मोकळी होते.

5. दुसऱ्या मूर्तीचे वैशिष्ट्य कोणते?

             उत्तर – एका कानातून घातलेला दोरा तिच्या तोंडातून बाहेर पडत असे हे दुसऱ्या   मूर्तीचे वैशिष्ट्य होय.

6. तिसरी मूर्ती सर्वश्रेष्ठ का होती?

            उत्तर – कारण तिसऱ्या मूर्तीच्या कानातून घातलेला दोरा सरळ जाऊन मूर्तीच्या डोक्यात गोळा होतो तो कुठूनही बाहेर पडत नाही.म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती मिळविलेले ज्ञान आपल्या मेंदूत साठवून ठेवते व जेव्हा पडेल तेंव्हाच त्या ज्ञानाचा वापर करतो.

ई.      खालील अ ब क गटातील जोड्या जुळवा.

अ                          ब                              क             

  1. पहिली मूर्ती         एकसहस्त्र मोहरा        ज्ञान ग्रहन करने
  2. दुसरी मूर्ती         दशसहस्त्र मोहरा          नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे
  • तिसरी मूर्ती        एकशतक मोहरा             हलक्या कानाचा

 उत्तर –   1.पहिली मूर्ती          एक शतक मोहरा          नळी फुंकली सोनारे इकडून                          

                                                                            तिकडे गेले वारे

   2..दुसरी मूर्ती            एक सहस्त्र मोहरा            हलक्या कानाचा

   3. तिसरी मूर्ती          दश सहस्त्र मोहरा            ज्ञान ग्रहन करने

      उ.  समानार्थी शब्द शोधून लिहा.

     ( अतिशय – राजा – मनोहर – खूप – कसोटी – नृप – तारीख – परीक्षा – सुंदर – प्रशंसा )

उत्तर = अतिशय – खूप

         1) राजा – मनोहर

         2) कसोटी – परीक्षा

         3) नृप – सुंदर

         4) तारीफ – प्रशंसा

         5) अतिशय – खूप

 ऊ.  खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या उलट अर्थाचे शब्द मोकळ्या जागेत भरून

   वाक्य पूर्ण करा.

          1. मूर्तिकार कष्टाळू होता, तो आळशी नव्हता.

          2. मूर्तीसाठी मृदू दगड चालत नाहीत त्यासाठी टणक दगड योग्य असतो.

          3. राजा भ्याड नव्हता, तो  धाडसी  होता.

          4. राजाने मुर्तीकाराकडे प्रशंसा केली  निंदा  केली नाही.

          5. प्रधान हा स्वार्थी नव्हता तो दयाळू होता.

ए.  खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करून लिहा.

          1. वेळ   – कलाकारासाठी वेळ खूप महत्वाची असते.

          2. सुंदर   –  मूर्तिकार खूप सुंदर मूर्ती बनवत असे.

          3. कठीण – दगडापासून मूर्ती बनविणे हे खूप कठीण काम असते.

          4. मूर्ती   – तीनही मूर्ती पाहून राजा खुश झाला.

3. कडूनिंब

1.कडूनिंबचे झाड कोठे आढळते?

उत्तर – कडूनिंबचे झाड भारत, श्रीलंका आणि मलेशिया येथे आढळते.

2.सदाहरित वृक्ष म्हणजे काय?

उत्तर – सतत हिरवेगार असणाऱ्या वृक्षांना  सदाहरित वृक्ष म्हणतात.

3.कडूनिंब ची झाडे कोणता वायू घेतात?

उत्तर – कडूनिंब ची झाडे कार्बन डायऑक्साईड वायू घेतात.

4.कीटक कडूनिंब च्या झाडाकडे का आकर्षिले जातात?

 उत्तर – कडूनिंब ची फिकट पिवळ्या रंगाची फुले पानाखाली लपलेली असतात. त्यांच्या गोड सुवासामुळे कीटक आकर्षिले जातात.

5.कडूनिंब ची फुले कशी असतात?

 उत्तर – कडूनिंब ची फुले छोटी व चांदण्यांच्या आकाराची असतात.

खालील प्रश्नांची उत्तरे 2-3 वक्यात लिही.

  1. कडूनिंब ची झाडे बागेत का लावतात?

उत्तर – कडूनिंब ची झाडे जास्त प्रमाणात प्राणवायू सोडतात म्हणून ही झाडे बागेत किंवा घराच्या आसपास लावतात.

  • कडूनिंब च्या बियापासून काय तयार करतात?

उत्तर – कडूनिंब च्या बियापासून तेल तयार करतात.

  • त्याचा कशासाठी उपयोग होतो?

उत्तर – त्याचा उपयोग त्वचेच्या रोगांवर केला जातो.

  • कडूनिंब च्या लाकडाचा उपयोग कशासाठी केला जातो?

उत्त्तर – कडूनिंब च्या लाकडाचा उपयोग होडी तयार करण्यासाठी केला जातो.

जोड्या जुळवा

               अ                                               ब

  1. कडूनिंब चे वृक्ष                         1. छोटी चांदण्यांच्या आकाराची 
  2. कडूनिंब ची पाने                        2. दाट घासण्यासाठी उपयोग      
  3. कडूनिंब ची फुले                        3. उदी रंगाची असतात
  4. कडूनिंब च्या काड्या                   4. साधारण 20-25 फुट उंच
  5. कडूनिंब ची साल                       5. हिरवी व रसरशीत असतात.

उत्तर – 1- 4,   2- 5,  3- 1  4- 2 ,  5- 3

    उ. रिकाम्या जागा भर.

  1. कडूनिंब ला काहीजण निंब किंवा लिमडा असेही म्हणतात.
  2. या झाडाची पाने वर्षातून एकदा गळून पडतात.
  3. पानांच्या कडा नागमोडी असतात.
  4. कडूनिंब चे झाड खूप औषधी असते.

     ऊ. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.

  1. सदाहरित –  कडूनिंबाचे झाड सदाहरित प्रकारात मोडते.
  2. रसरशीत  – कडूनिंबाची पाने हिरवी व रसरशीत असतात.
  3. चमकदार –  कडूनिंबाची पाने चमकदार असतात.
  4. नागमोडी – पानांच्या कडा नागमोडी असतात.
  5. दुतर्फा – उत्तर भारतात ही झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावलेली दिसतात.
  6. औषधोपयोगी – कडूनिंबाचे तेल औषधोपयोगी असते.

     उलट अर्थाचे शब्द लिहा

  1. शब्द           x      निशब्द   
  2. फिकट         x       गडद
  3. आकर्षक      x       अनाकर्षक
  4. वाढणे         x       कमी होणे, खुंटणे

                            4.मधमाशी

   आ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. मधमाशी काय मिळवण्यास जाते?

     उत्तर – मधमाशी मध मिळवण्यास जाते.

  • मधमाशी मध कसा साठवते?

      उत्तर – मधमाशी मध थेंब थेंब साठवते.

  • आळस कोणाला ठाऊक नाही?

       उत्तर – आळस मधमाशीला ठाऊक नाही.

  • नित्य कशाचा साठा करावा असे कवी म्हणतो?

        उत्तर – नित्य मधमाशीच्या गुणांचा  साठा करावा असे कवी म्हणतो.

  • मिळालेल्या गुणाचा वापर कशासाठी करावा?

       उत्तर – मिळालेल्या गुणाचा वापर इतरांसाठी  करावा.

      इ. खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.

आळस तिजला ठाऊक नाही

सर्व दिवस ति खपते पाही

थंडी उन म्हणेना काही

उद्योगी मोठी II 2 II

    उत्तर – मधमाशी ही खूपच कष्टाळू असते. ती थंडी, ऊन काहीही असो सर्वच दिवस आळस न करता मध गोळा करून त्याचा साठा करून  जपून ठेवण्याच्या  आपल्या उद्योगात मग्न असते.असे कवितेच्या वरील ओळींवरून आपल्याला कळते.

    ई. कवितेत वर्णन केलेल्या माधामाशीचे गुण 4-5 वाक्यात लिही.

    उत्तर – मधमाशी ही सकाळी उठून मध मिळवायला जाते. ती सतत उद्योगी असते. जमवलेला

             मध ती साठवून ठेवून त्याची जपणूक करते.अशी ही मधमाशी थंडी,ऊन याची तमा न बाळगता काम करत राहते.

    उ. मधमाशी प्रमाणे सतत उद्योगी असणाऱ्या कीटकांची यादी कर.

    उत्तर-  मुंगी,  रेशीमकिडा, कोष्टी  हे कीटक मधमाशी प्रमाणे सतत उद्योगी असतात.

ही पोस्ट शेअर करा...