सरकारी शाळेत मूकबधिर मुलगी बनली साक्षर


“अशक्य असं या जगात काहीच नसतं,

त्यासाठी तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे.”

असाच काहीसा अनुभव खानापूर तालुक्यातील भिमगड अभयारण्यातील अती दुर्गम अशा मेंडिल या गावी गुरु शिष्याच्या कृतीतून दिसून येत आहे.

मेंडील या गावामध्ये लोअर प्रायमरी शाळा असून पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गांमध्ये 9 विदयार्थी शिकत आहेत. मागील 7-8 वर्षे शाळेला कायमस्वरुपी शिक्षक नाही. अतिदुर्गम असल्याने शाळेला येणे जाणे म्हणजे जीव मुठीत घेवून जावे लागते. शाळेने आजपर्यंत अनेक शिक्षक पाहिलेत. सर्वजण शाळेमध्ये राहूनच काम करत होते.

मागील 10 वर्षांपासून या शाळेत नामदेव अनगोळकर हे अतिथी शिक्षक म्हणून काम करत आहेत. मूळचे इदलहोंड ता. खानापूर इथले हे शिक्षक आठवडाभर शाळेतच वास्तव्य करतात आणि शनिवारी घरी जातात. तसं पाहिलं तर अगदी तुटपुंज्या पगारात सर मागील 10 वर्षांपासून विद्यार्थी घडवत आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांविषयी त्यांना खूपच तळमळ. त्यांच्या याच तळमळीचे एक जिवंत उदाहरण म्हणजे त्यांनी केलेला हा एक विशेष प्रयत्न जो एका मूकबधिर मुलीचे आयुष्याचं सोनं करणारा आहे.

मेघा रामनाथ पाटील ही इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी जन्मतः मूकबधिर आहे. तिने इयत्ता पहिली मध्ये या शाळेत प्रवेश घेतला. इतर मुलांच्याप्रमाने तिला शिकवणं शक्य नव्हतं कारण तिला काहीच बोलता व ऐकू येत नव्हतं. मग सरांनी तिला शिकविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी You Tube वर या विशेष मुलांच्या सांकेतिक चिन्हांचा अभ्यास करून तिला शिकविण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या प्रयत्नांना मेघानेही चांगला प्रतिसाद दिला. आज ती मराठी, इंग्लिश, कन्नड भाषा शिकत आहे. तसेच गणितेही सोडवते. मागे गावात झालेल्या कार्यक्रमात तिने उत्तम असा डान्सही सादर केला होता. हे सर्व शक्य झाले ते एका ध्येय वेड्या शिक्षकामुळे.

अशा या शिक्षकांना आमचा मानाचा मुजरा !!!

आम्हा साध्या माणसांना ,सोपा केला परिपाठ”

व्हिडिओ पहा 👇👇

ही पोस्ट शेअर करा...